जुन्नर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ७० ते ८० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

1 min read

नारायणगाव दि.१५:- महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगावात छापेमारी केली आहे. नारायणगावात पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र कनेक्शन उघड केले आहे.

नारायणगावातील एका इमारतीत महादेव बेटिंग ऍपचे काम सुरू होते. या प्रकरणात तब्बल ७० ते ८० जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात महादेव बेटिंग ऍप प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीने (ED) देशातील विविध राज्यांत धाडी टाकत कारवाई केली आहे. पुण्याच्या नारायणगावमध्ये पोलीसांनी छापेमारी करत तब्बल ७० जणांना ताब्यात घेतले आहे.

महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणी परदेशासह देशातील काही राज्यांमध्ये छापेमारी करत कारवाई करण्यात आली होती. महादेव बुक ॲप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवी माहिती मिळत आहे. या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आणि त्यांची चौकशी सुरू आहे.

अशात आता महादेव ऑनलाइन बेटिंग ऍपचे काम पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे छापेमारी केली आहे.

पोलिसांनी या इमारतीत छापा टाकला त्यावेळी ७० ते ८० जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अख्खी इमारतच महादेव एप संदर्भातील कामासाठी वापरली जात असल्याचे पुढे आले. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे