बांगरवाडीत घरातून भर दुपारी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
1 min read
बेल्हे दि.८:- बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील वाडेकर वस्ती भर दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांनी चोरी करून २ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी मंगळवार दि.७ रोजी दुपारी ४ वाजता रामदास तुकाराम वाडेकर (वय ५४, रा.बांगरवाडी ता. जुन्नर) हे घराला कुलूप लावून शेतामध्ये गेले असता अज्ञात व्यक्तींनी घरात शिरून सर्व साहित्याची उचकापाचक केली व कपाटाचे लॉक तोडून गाडीचा हप्ता भरण्यासाठी
ठेवलेले १ लाख ५४ हजार रुपये रोख तसेच ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा २ लाख १७ हजार रुपयाचा ऐवज लंपास पास केला आहे.
रामदास वाडेकर यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात आळेफाटा पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे पुढील तपास करीत आहे.