ब्रेकिंग..बिबट्याच्या हल्यात महिला ठार; जुन्नर तालुक्यात आठवड्यात दुसरी घटना; नागरीक संतप्त
1 min readपिंपरी पेंढार दि.१०:- जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार जवळील गाजरपट येथे पिकाची राखण करणाऱ्या नानुबाई सीताराम कडाळे (वय ६०) या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी सव्वा आठ वाजन्याच्या सुमारास घडली.आठवड्यात दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी काळवाडी येथे बिबट्याने जीव घेतला तर आज ही दुसरी घटना घडली आहे.
तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.