खते, बियाणांचा काळा बाजार करणार्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
1 min read
नगर दि.२८:- राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिले. खते, बियाणे यांचा काळा बाजार करणार्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या. मुंबईत झालेल्या बैठकीत राज्यातील खरीप हंगामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित हाेते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकरी देशाचा कणा आहे.
त्यामुळे राज्य शासनाने शेतकर्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, असे तालुके आणि जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.