प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्नर तालुक्यात मेळावा
1 min readजुन्नर दि.६:- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जनसंवाद दौऱ्या दरम्यान आयोजित सहकार मेळावा रविवार दि.५ रोजी
प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्नर तालुक्यातील १४ नंबर, स्व. वल्लभ बेनके यांचे फॉर्म हाऊस या ठिकाणी पार पडला. स्व. वल्लभ बेनके यांना अभिवादन करून या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
या मेळाव्यासाठी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि शेतकरी यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थितांना प्रफुल्ल पटेल यांनी मार्गदर्शन केले आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना घड्याळ चिन्हा समोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.
यावेळी समवेत देवेंद्र शहा, सभापती संजय काळे, पांडुरंग पवार, गणपत फुलवडे, बाळासाहेब खिलारी, भाऊसाहेब देवाडे, समदभाई इनामदार, पापाशेठ खोत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अतुल भांबेरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सुप्रिया लेंडे, प्रकाश ताजणे, विकास दरेकर,
रघुनाथ लेंडे, महादेव वाघ,प्रशांत दाते यांसह जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि विविध कार्यकारी संस्थांचे सर्व संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.