नारायणगाव आगाराच्या धोकादायक बस, आगार प्रमुख व परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष
1 min read
नारायणगाव दि.७:- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आगारातील बहुतांश बस या पूर्णत: धोकादायक व खिळखिळ्या झालेल्या असून प्रवासी व वाहन चालक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.वा स्तविक तालुक्यातील पश्चिम अदिवासी भागामध्ये महामंडळाच्या बसच्या फेर्या या मोठ्या प्रमाणात होत असतात.
तसेच मर्यादेच्या वर काही बसमध्ये प्रवासी येतात जातात, यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, मात्र असे असताना या बसेसचे दरवाजे, पत्रे तसेच काचा व वरील छत व सांगाडे हे पूर्णत: निकामी झालेले असताना अशा धोकादायक बसेसच्या पत्र्यांना व छताला वेल्डींग करून पुन्हा रस्त्यावर पाठवत असतात.
मात्र यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, खरं तर नारायणगाव आगाराच्या बस या तालुक्यातील खेडेगावांपासून ते शहरांपर्यंत धावत आहेत, मात्र या बसमध्ये जीव मुठीत धरून प्रवासी, शालेय विद्यार्थी येत जात आहेत.वास्तविक या निकामी झालेल्या बस व मर्यादा संपलेल्या बसदेखील दुरूस्त करून. पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी पाठवून हा सुखाचा नव्हे तर धोक्याचा प्रवास करण्यासारखाच आहे.
या गोष्टीकडे नारायणगाव आगाराचे अधिकारी व परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनी वेळीच लक्ष देऊन चांगल्या बसेस तालुक्यात पाठवाव्या अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.