चाळकवाडी टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांची लूटमार
1 min read
आळेफाटा दि.१६:- पुणे – नाशिक महामार्गावर चाळकवाडी (ता.जुन्नर) येथे टोलनाका असून या ठिकाणी स्थानिक वाहनधारकांची लूट होताना दिसून येत आहे. स्थानिक वाहनांच्या स्थानिक वाहन असल्याच सांगूनही या ठिकाणी टोल वसुली केली जात आहे.
या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची अरेरावी सुद्धा वाढत चालली आहे. हा टोल अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडत असून या ठिकाणी स्थानिकांच्या फास्टटॅग मधून पैसे कापले जात आहेत. महिन्याभरात लाखो रुपये या स्थानिकांच्या वाहनातून या टोलनाका वसूल करत असल्याचा अंदाज आहे.
स्थानिक वाहनांचं रेकॉर्ड ठेवणार सॉफ्टवेअर यांच्याकडे नसल्यामुळे ही लुटमार सध्या सुरू आहे. सध्या स्थानिक वाहनाचे कोणतेही रेकॉर्ड टोल प्रशासनाकडे नाही कोणते वाहन स्थानिक आहे हे टोल प्रशासनाला कळणे कठीण जात आहे.
आळेफाटा ही शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ असून कांदा मार्केट येथे आहे तसेच नारायणगाव येथे टोमॅटो मार्केटला जाण्यासाठी शेतकऱ्यांची या रस्त्यावरून मोठी जा ये असते फास्टटॅग मधून पैसे कट झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना या टोल चा भुर्दंड सोसावा लागत आहे. स्थानिकांची लूटमार कधी थांबणार असा प्रश्न स्थानिक वाहनधारक करत आहेत.
“स्थानिकवाहन धारकांसाठी ३३० रुपयांचा मासिक पास असून त्यांनी तो काढून घ्यावा अन्यथा फास्टटॅग मध्ये बॅलन्स कमी ठेवावे. पैसे कट झाल्यास १०३३ नंबरवर फोन करून कंप्लेंट करावी.”
सागर पवार, मॅनेजर चाळकवाडी टोल नाका
“स्थानिक वाहनधारकांकडून टोल प्रशासनाने टोल आकारू नये, स्थानिकांकडून टोल आकारआल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल.”
तान्हाजी तांबे, जुन्नर तालुका अध्यक्ष मनसे