शिंदे मळ्यातील वेताळ बाबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
1 min read
बेल्हे दि.२९:- वेताळ बाबा यात्रा उत्सव शिंदेमळा (बेल्हे,ता.जुन्नर) येथे रविवार दि.२८ रोजी मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते ९ वा मांडव डहाळे, दुपारी ३ ते ४ वा अभिषेक व सत्यनारायण महापूजा. सायंकाळी ७ ते १० वा महाप्रसाद रात्री १०:३० वा काठी मिरवणूक असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री वेताळ बाबा युवा मित्र मंडळ, श्री वेताळ बाबा यात्रा कमिटी शिंदेमळा व समस्त ग्रामस्थ, मुंबईकर, पुणेकर मंडळी यांनी केले.