बेल्ह्यातील जि.प. शाळेत शिक्षण परिषद; शाळेला वर्षात १२ लाख ६४ हजार रुपयांचा लोकसहभाग जमा; विशेष गौरव

1 min read

बेल्हे दि.२७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं- १ शाळेत शनिवार दि.२७ बीटस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बेल्हे बीट (ता.जुन्नर) मधील बेल्हे, निमगाव सावा, अणे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती जुन्नर च्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे ,विस्तार अधिकारी विष्णू धोंगडे यांनी उपस्थित राहून बीट मधील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत पुढील शैक्षणिक वर्षात करावयाच्या विविध शैक्षणिक कामांबद्दल मार्गदर्शन केले. बेल्हे बीटमधील सर्व शाळांचे कामकाज चांगले असून गुणवत्ता वाढीसाठी अधिक अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

केंद्रप्रमुख रत्नप्रभा वाकचौरे, सर्वश्री काळे, शौकत पटेल, सोपान बेलकर, सविता कुऱ्हाडे यांनी यावेळी सर्व शाळांच्या वार्षिक निकालपत्रक पुर्ततेची पाहणी करून मंजुरी दिली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं- १ शाळेने या शैक्षणिक वर्षात 12 लाख 64 हजार रुपयांचा लोकसहभाग जमा केले बद्दल शाळेचे मुख्याध्यापक मीरा बेलकर व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.विषय तज्ज्ञ सचिन गुंजाळ व विलास पिंगट यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे शिक्षणाफाउंडेशने शाळेत 10 दिवसांचा पाखरांची शाळा समर कॅम्प आयोजित केलेबद्दल संस्थेचे प्रतिनिधी स्वाती शेलार व आदेश जगताप यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. गव्हाळी शाळेचे मुख्याध्यापक संजय गडगे यांचा सेवनिवृत्तीबद्दल सन्मान करण्यात आला.बेल्हे नं-१ शाळेतील उपशिक्षक हरिदास घोडे , संतोष डुकरे, कविता सहाणे,सुवर्णा गाढवे ,प्रविणा नाईकवाडी, योगिता जाधव, अंजना चौरे, यांनी शिक्षण परिषदचे नियोजन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे