श्री बेल्हेश्वर विद्यामंदिराचे राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदिपक यश
1 min read
बेल्हे दि.२९:- बेल्हे (ता. जुन्नर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरातील ७ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती आणि २६ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य अजीत अभंग यांनी दिली.
बेल्हे येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस तसेच सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारली. विद्यालयातील एकूण ८६ विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी तर २६ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीत यशस्वी ठरले.राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणेः कार्तिकी शरद कोकणे (१५१ गुण), प्रतिक नितीन वाघ (१४० गुण), धीरज भिमसेन पिंगट (१३९ गुण), श्रावणी स्वप्निल शिंदे (१२७ गुण), श्रद्धेश शरद जेडगुले (१२५ गुण), धीरज सुधाकर गुंजाळ (१२४ गुण), वैष्णवी रंगनाथ माळवदकर (७२गुण).
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्तीसाठी वार्षिक १२ हजार रुपये या प्रमाणे पाच वर्षांसाठी एकूण ६० हजार रुपये तर सारथी शिष्यवृत्तीसाठी वार्षिक ९६०० याप्रमाणे पाच वर्षांकरिता ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यालयाच्या या विद्यार्थ्यांसाठी पुढील पाच वर्षात एकूण १६ लक्ष ६८ हजार रुपये मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख किशोर विधाटे, नितीन मुळूक, जयश्री फापाळे, विकास गोसावी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.