नीलेश लंके यांची ४५ लाखांची संपत्ती

1 min read

अहिल्यानगर दि.२५:- महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी मंगळवारी (दि .२३) अहिल्यानगर लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासाेबत दिलेल्या शपथपत्रात नीलेश लंके यांची व त्यांच्या पत्नीची स्थावर व जंगम मालमत्ता ४५ लाख ५४ हजार ५६० रुपये आहे. मागील पाच वर्षात त्यांची संपत्ती २९ लाखांनी घटली आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत लंके यांनी सादर केलेल्या शपथ पत्रानुसार त्यांच्याकडे ६० लाख १५ हजारांची जंगम, तर १५ लाख ३५ हजारांची स्थावर, अशी ७५ लाख ५० हजारांची मालमत्ता होती. त्यात आजमितीला २९ लाखांची घट झाली आहे.नीलेश लंके यांच्या नावावर जंगम मालमत्ता २३ लाख ३२ हजार २२६ रुपये, तर स्थावर मालमत्ता १९ लाख २२ हजार २१० रुपये आहे. त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्याकडे २ लाख ७८ हजार २८४ जंगम मालमत्ता, तर कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्याकडे ८१ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. १३ लाख रुपयांच्या कर्जावर घेतलेले चार चाकी वाहन आहे. नीलेश लंके व त्यांच्या पत्नीकडे ५० ग्रॅम साेने असून ३७ लाख ४८ हजारांचे लंके यांच्यावर कर्ज आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे