श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल चे ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
1 min read
रानमळा दि.१८:-श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल रानमळा (ता.जुन्नर) च्या विद्यार्थांचे NMMS सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या वर्षी विद्यालयातील एकूण १० विद्यार्थी NMMS सारथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून या उत्तीर्ण १० विद्यार्थ्यांपैकी एकूण ८ विद्यार्थी हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.या परिक्षेसाठी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रखामाजी कापसे यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम जगताप, रमेश मालुंजकर, माया माळवे, जयश्री थोरात, विद्या ढगे व संतोष कर्डक या सर्व शिक्षकांनीही मार्गदर्शन केले.या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांस प्रत्येकी एकूण ३८,५०० रूपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.