आरटीई ऑनलाइन प्रवेश सुरू ; पालकांची प्रतीक्षा संपली

1 min read

पुणे दि.१७:- आरटीई पोर्टलवर चार ते पाच वेळा मुदतवाढ देऊन शाळा नोंदणीसह रिक्त जागांची आकडेवारी अद्ययावत केल्यानंतर अखेर ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळाला आहे. आरटीईअंतर्गत रिक्त असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशासाठी दि.१६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी पार पडल्यानंतर आरटीई कायद्यांतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांकरिता २५ टक्के रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवात होते.

यंदा प्रवेश प्रक्रियेला दोन महिने उशिराने सुरुवात झाली आहे. त्यात दीड महिना शाळांची नोंदणी करण्यात गेला आहे.

पुणे जिल्ह्यात ७८ हजार जागा आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यांतील ५ हजार १५३ शाळा नोंदणी केली आहे.

या शाळांमध्ये ७७ हजार ९२७ जागा रिक्त आहेत. https://student.maharashtra.g ov.in/adm_portal/Users/rte_in dex_new या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.

राज्यात ७५ हजार ९७४ शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के रिक्त असलेल्या ९ लाख ७२ हजार ८२३ जागा अद्ययावत केल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे