जांबुतमध्ये आता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मिळणार पुणे शहरासारखे उच्च प्रतीचे शिक्षण
1 min read
जांबूत दि.१७:- आदर्श ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित आदर्श इंग्लिश स्कुल आणि जुनिअर कॉलेज जांबुत (ता. शिरूर जि. पुणे) सदर विद्यालय unique international schools pune या संस्थेने चालवण्यासाठी घेतले आहे.
पुणे येथे असणाऱ्या unique international school या स्कुलप्रमाणे शहरासारख्या सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तसेच विविध उपक्रम (activities) तयार करणार व घेणार आहे. तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर परीक्षा, खेळ, व इतर स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करणार आहोत.
असे unique international school पुणे चे अध्यक्ष दत्तात्रय कोबारणे यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपण कमीत कमी खर्चामध्ये अगदी माफक फी मध्ये पुणे शहरासारख्या शैक्षणिक गुणवतेची हमी देणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच जुनिअर कॉलेज साठी राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या NEET( UG), JEE( main), MHT -CET यासारख्या परीक्षेची देखील तयारी करून घेणार असून यासारख्या अनेक उपक्रम राबवणार असून त्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याने लवकरात लवकर आपल्या पाल्यच्या उज्वल भविष्यासाठी प्रवेश घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे.