पिंपळवंडी यात्रा कमिटी अध्यक्षपदी विवेक काकडे तर उपाध्यक्षपदी प्रवीण फुलसुंदर

1 min read

पिंपळवंडी दि.१८:- पिंपळवंडी गावचे ग्रामदैवत श्री मळगंगादेवीच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विवेक काकडे, तर उपाध्यक्षपदी प्रवीण फुलसुंदर, प्रवीण लेंडे, वैभव कालेकर यांची निवड करण्यात आली आहे. पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री मळगंगा देवीच्या तीनदिवसीय यात्रोत्सवास १ मेपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यती व कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा महोत्सवाच्या नियोजनासाठी नुकतेच ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत कमिटीच्या अध्यक्षपदी उद्योजक बबन दांगट व उपाध्यक्षपदी किशोर शेटे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी यात्रा कमिटी अध्यक्षपदी विवेक काकडे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी प्रवीण फुलसुंदर, प्रवीण लेंडे, वैभव कालेकर, कार्याध्यक्षपदी दशरथ वाळुंज, निवृत्ती वाघ, सचिवपदी राजेश काकडे, भरत शिंदे, सुखदेव लेंडे व खजिनदारपदी संदीप लेंडे, संजय भुजबळ आदींची निवड करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे