आळे येथे बिबट्यांच्या हल्ल्यात २ मेंढ्यांचा मृत्यू

1 min read

बेल्हे दि. १८:- आळे व पिंपळवंडी परिसरात शेतात बसलेल्या मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्यांनी हल्ला करून २ मेंढ्यांचा फडशा पाडला. या घटना बुधवारी (दि.१७) अनुक्रमे पहाटे व सकाळी घडल्या. आळे (ता.जुन्नर) येथील बाजारतळ परिसरात धर्मेंद्र कुऱ्हाडे यांच्या शेतात बसविलेल्या दत्तू चितळकर यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून ३ वर्षे वयाची मेंढी ओढत नेत. तिचा फडशा पाडला. मेंढ्यांच्या आवाजाने चितळकर जागे झाले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पलायन केले. दुसरी घटना पिंपळवंडी येथे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. परिसरातील ओढ्यालगत व कोकाटेमळ्याच्या बाजूला चिमाजी भागाजी सोन्नर या मेंढपाळाने मेंढ्या चरण्यास सोडल्या होत्या. या वेळी उसाच्या शेतात दवा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करीत २ वर्षांची मेंढी ओढत नेत तिचा फडशा पाडला. या दोन्ही घटनांचा पंचनामा आळे वनपरिक्षेत्राचे वनपाल संतोष साळुंखे यांनी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे