वादळी वाऱ्याने खंडित झालेली वीज पूर्ववत
1 min read
Oplus_131072
बेल्हे दि.१७:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात मंगळवार दि.१६ बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. काही गावांत जास्त तर काही गावांत कमी प्रमाणात पाऊस पडला परंतु वादळी वारा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खूप ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बेल्हे परिसरात वादळी वाऱ्यामुळे विद्युत वाहिनीच्या तारांवर झाडे पडल्यामुळे बेल्हे, गुळुंचवाडी, बांगरवाडी, आणे परिसरात विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.
बेल्हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि वीज कर्मचारी नीलकंठ फुंदे, सुरेश गुंजाळ, अविनाश सोळंके, राहुल बोरचटे, विवेक पाटील, संतोष घोडके, अमोल अनमोरवर, राजू कडलक यांनी रात्री दहा वाजेपर्यंत काम करून विद्युत वाहिनी पूर्ववत केली.
वादळी वारे आणि पाऊस पडत असताना विद्युत पुरवठा चालू असल्यास काही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता त्यामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. ज्या ठिकाणी विद्युत तार तुटली असेल, झाडे पडली असतील किंवा डीपी वर काही तांत्रिक बिघाड झाल्यास स्थानिकांनी
ताबडतोब वीज कर्मचाऱ्यांना संपर्क साधावा तसेच कुणीही विद्युत तारेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले.
तसेच वादळात पावसात कर्मचाऱ्यांना काम करणे जिकिरीचे असते निसर्गापुढे आमचा नाईलाज असतो त्यामुळे पाऊस थांबत पर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वीज कर्मचारी नीलकंठ फुंदे व सुरेश गुंजाळ यांनी नागरिकांना केले.