बेल्ह्यातील ज्यूस विक्रेत्याला अन्न व औषध प्रशासनाची नोटीस; बर्फाच्या लादित सापडला होता मृत उंदीर

1 min read

बेल्हे दि.१३:- बेल्हे (ता.जुन्नर) येथे रस आणि थंड पेये देण्यासाठी वापरलेल्या खाद्य बर्फात गोठलेल्या उंदराचा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने चौकशी सुरू केली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावातील जय बजरंग कोल्ड ड्रिंक्स आणि ज्यूस बारमध्ये खाण्यायोग्य बर्फाच्या ब्लॉकमध्ये गोठलेला उंदीर आढळून आला होता. अन्न आणि सुरक्षा प्रशासनाने अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ आणि अन्न सुरक्षा आणि मानक नियम २०११ नुसार परवाना नसताना.

गेल्या चार वर्षांपासून अन्न सुविधा चालवणाऱ्या विक्रेत्याला नोटीस जारी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा विक्रेता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण परवान्याशिवाय काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सहआयुक्त अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे, अन्न सुरक्षा अधिकारी बी. ए. शिंदे, एस. एन. जगताप, ए. जी. गायकवाड यांनी छापा टाकला. अहमदनगरच्या निघोज गावातील एका कंपनीकडून बर्फाचे तुकडे खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.

एफडीए पुणे टीमने शुक्रवारी अहमदनगर टीमला बर्फ निर्मिती कारखान्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोडगिरे म्हणाले, ‘सुमारे ३०० किलो खाद्य बर्फाचा साठा नष्ट केला आहे. आम्ही ज्यूस सेंटरमधून बर्फ आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने घेतले आहेत आणि ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.’

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे