राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बेल्हे – राजुरी गटाच्या अध्यक्ष पदी पांडुरंग साळवे यांची निवड
1 min read
बेल्हे दि.११:- साकोरी (ता. जुन्नर) गावचे माजी सरपंच पांडुरंग साळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अशी माहिती जुन्नर तालुका शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष तुषार थोरात यांनी दिली. तर पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाचे ध्येय व धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे पांडुरंग साळवे यांनी सांगितले.
नुकतेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी पांडुरंग साळवे यांचा निवड झाल्याने साकोरी गावात जाहीर सन्मान केला.