सिंहगड मध्ये नॅशनल कॉन्फरन्स ऑन परव्हॅसिव कॉम्प्युटिंग 2024 चे आयोजन
1 min read
पुणे दि.१०:- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव बुद्रुक, पुणे मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभाग व विभागातील इंक्युबेशन सेलसोबत् संलग्न कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, उच्चशिक्षण घेणारे संशोधक यांच्या शोधनिबंधांना वाव देण्यासाठी. एक दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स ऑन परव्हॅसिव कॉम्प्युटिंग 2024 चे आयोजन करण्यात आल्याचे प्रा.तुषार काफरे यांनी सांगितले.सदर कॉन्फरन्ससाठी प्रमुख पाहुणे टाटा टेक्नॉलॉजी पुणे चे असोसिएट डायरेक्टर श्री अनिरुद्ध बर्वे हे उपस्थित होते.उपस्थितांना संबोधित करताना इलेक्ट्रिकल व्हेहिकल्स व त्यामध्ये असलेल्या जॉबच्या संधी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
आय व्हि एल लॅब, चे असोसिएट व्हॉइस प्रेसिडेंट विशाल देशपांडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते उद्योजकता व संधी याबाबत बोलत असताना इंजिनियर्स ने जॉबच्या पाठीमागे न लागता उद्योजक बनावे असे ते म्हणाले. प्रसंगी विविध प्रभागामधून १३० शोधनिबंध सादर झाले असून त्यातील काही शोधनिबंध scopus journals मध्ये प्रकाशित केले जातील.
असे कॉन्फरन्सचे संयोजक डॉ. एम. बी. माळी, डॉ. एस. ओ. राजनकर, सहसंयोजक डॉ. व्ही. जी. राऊत यांनी सांगितले. डॉ. आर. पी. पाटील, डॉ. एस. ए. शिरसाठ, प्रा. जे. ए. देसाई, प्रा. एस. व्ही. ताठे यांनी सदर कॉन्फरन्स चे कामकाज पाहिले. सदर कॉन्फरन्सच्या यशस्वी आयोजनासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे उपप्राचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी.
इलेक्ट्रॉनिक्स् अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. एम.बी. माळी यांनी विशेष मार्गदर्शन केले. प्रसंगी कॉन्फरन्स प्रोसेडिंगचे अनावरन करण्यात आले होते. प्रा. जे. ए. देसाई यांनी सूत्रसंचालन तर डॉ. व्ही. जी. राऊत यांनी आभार मानले.