मनसेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंच्या सूचना
1 min read
मुंबई दि.९:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, अशी घोषणा त्यांनी आज मंगळवारी (दि. 9 एप्रिल) गुढीपाडवा मेळाव्यात केली आहे. तसेच कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२०१९ च्या निवडणुकांनंतर आता निवडणुका होत आहेत. त्यानंतर आता आचारसंहितावाले जागी झाले आहेत. काल मी एक बातमी वाचली. आचारसंहिता म्हणून महापालिकेचे डॉक्टर आणि नर्सेस यांना मतदानाच्या कामात गुंतलं आहे.
डॉक्टर मतदारांच्या नाळ्या तपासणार का? की नर्सेस मतदारांचे डापर्स बदलणार आहेत, ज्याच्यासाठी त्यांची नेमणूक केली आहेत तिथे ते नसावेत का?
निवडणुका होणार आहेत हे निवडणूक आयोगाला माहिती असते. मग समांतर एक फळी का उभी करत नाहीत?”, असा सवाल करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.