सेंद्रिय पद्धतीने फुलवले टर्किश बाजरीचे पीक; उत्पादनातून १ लाख रुपयांचा नफा
1 min read
आळेफाटा दि.८:- आळे लवणवाडी येथील एका शेतक-याने बाजरी पिक चांगल्या प्रकारे पिकवले असुन या मधुन त्यांना मिळणार एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.आळे लवणवाडी (ता.जुन्नर) येथील जुन्या पिढीतील शेतकरी जबाजी भाऊ कु-हाडे यांचे शिक्षण कमी असताना देखील आपल्या शेतात आधुनिक पध्दतीने वेगवेगळी पिके घेऊन चांगल्या प्रकारचा नफा ते नेहमी मिळवत आहे.
या वर्षी त्यांनी उन्हाळी बाजरी पिक घेण्याचे ठरवले त्यानुसार यासाठी एक एकर श्रेत्राची निवड केल्यानंतर त्यामध्ये चार ट्राॅली शेणखत पांगवले.त्यानंतर ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटरून घेतले.कु-हाडे यांचे वय ९० च्या आसपास असताना देखील देश विदेशात पालेभाज्या, ज्वारी, गहू , बाजरी यांची पिके कश्याप्रकारे घेतले जाते यांची माहीती असल्याने यावेळेस तुर्की या देशात संकरित झालेली देशी टर्किश या बियानाचा वापर करण्याचे ठरवले.
त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातुन या ठिकाणाहुन अकराशे रूपये किलो प्रमाणे एक किलो बियाणे आणुन आधुनिक पध्दतीच्या यंत्राद्वारे दोन बाय सहा इंचाच्या अंतरावरती पेरणी करून सारे पाडले. वेळोवेळी औषधे फवारणी पाणी दिल्याने व कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर न केल्याने हे पिक सध्या फुलो-यात आले असुन
त्यांना एक एकर मध्ये घेतलेल्या बाजरीच्या पिकासाठी २५ हजार रूपये खर्च आला असुन या मधुन त्यांना ४० ते ५० क्विंटल धान्य मिळणार आहे व सध्या बाजरीला एका किलोला ३० ते ३२ रुपये बाजार भाव चालु असुन झालेला खर्च वजा जाता १ लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. जुन्या काळी बाजरीचे पिक फक्त पावसाळ्यातच होत असे परंतु काळानुसार बदल होत गेल्याने.
व आधुनिक पद्धतीचा वापर आल्याने पावसाळ्यात होणारे पिक आता शेतकरी उन्हाळ्यात घेऊ लागले आहे.व यासाठी देशी विदेशी बियांणांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे निघेल याकडे लक्ष देण्याचे ठरवले त्यानुसार तुर्की या देशात पिकवली जाणारी देशी टर्कीश या बियाणांचा वापर केला व ही बाजरी भारतात अत्यंत तुरळक ठिकाणी आहे.
——-
प्रतिक्रिया
“या बाजरीची वैशिष्ट्ये म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन होते व एकरी एक किलो बियाणे लागते प्रत्येक ताटाला सहा ते आठ फुटवे असतात. उन्हाळी हंगामात या बाजरीची उंची दहा ते बारा फूट असते. ही बाजरी काढण्यासाठी १२० दिवस लागतात व बाजरी हे पिष्टमय पिक असल्याने त्यात कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते. तुर्की देशातील या टर्किश १०० ग्रॅम बाजरीत ६७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स,
१२ ग्रॅम प्रोटीन,५ ग्रॅम फॅट्स, १ ग्रॅम मिनरल असते. सरासरी एकरी उत्पादन ४०ते ५० क्विंटल होते. तुर्की देशातील ही बाजरी खायला चवदार आणि भाकरी पांढरी व हिरवी असते. खत व्यवस्थापन आपल्या नियमित बाजरीच्या दोन पट जास्त लागते. या बाजरीचे राखण करण्यासाठी बोटा तालुका संगमनेर येथील ठाकर समाजाचे बाळू दुधवडे यांना धान्यात अर्धा वाटा या पद्धतीने देण्यात आलेले आहे.”
जबाजी कु-हाडे, बाजरी उत्पादक शेतकरी, आळे
प्रतिक्रिया- “आळे लवणवाडी येथील प्रगतशिल शेतकरी जबाजी कु-हाडे यांनी या वयात सुध्दा अतीशय नियोजन बद्ध व आधुनिक पध्दतीने शेती करत आहेत.व त्यांनी सध्या देशी टर्कीश या बाजरीच्या बियाणांचा पेरणी केली असुन या जातीची बाजरी भारतामध्ये तुरळक प्रमाणात आढळुन येत आहे.वेळोवेळी औषधे फवारणी व जैविक खतांचा वापर केल्याने बाजरीचे पिक चांगले आहे .
कृषी अधिकारी –उमेश महाले
बाजरी बाजारभाव
सन २०२१ एका किलोस २५ ते २८ रूपये, सन २०२२ एका किलोस २२ ते २६ रूपये, सन २०२३ एका किलोस २४ ते २९ रूपये, सन २०२४ एका किलोस २५ ते ३२ रूपये किलो