पुणे – नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग भूसंपादनास राजुरीच्या शेतकऱ्यांचा विरोध

1 min read

राजुरी दि.२७:- पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ११ यासाठी भूमी संपादन, बांधकाम देखभाल व व्यवस्थापन एक सार्वजनिक प्रयोजन म्हणून

जमिनीच्या अधिग्रहित अधिकरण संपादन प्रक्रिया सुरू करण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ मार्च २०२४ रोजी जाहीर प्रगटीकरण देऊन २१ दिवसाची मुदत देऊन हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर बुधवार दि .२७ रोजी राजुरी येथील बाधित शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी होत असलेल्या महामार्गास प्रखरपणे विरोध केला या प्रसंगी गावचे उपसरपंच माऊली शेळके,ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी , वल्लभ शेळके, एम.डी.घंगाळे, दत्तात्रय हाडवळे, जि.के.औटी, आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. यावेळी बाधित शेतकरी व ग्राहक पंचायती

चे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी या पट्ट्यातील शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती व दूध व्यवसाय हा आहे मात्र हा मार्ग गेल्यास त्यांचे उत्पादनाचे साधन राहणार नाही

तसेच अनेक शेतकरी जमीन गेल्याने पूर्ण विस्थापित होणार आहेत यापूर्वी देखील पिंपळगाव जोगा कालवा, कुकडी डावा कालवा, नगर कल्याण महामार्ग, नियोजित नगर रेल्वे मार्ग, आदींचा देखील सर्वे सध्या सुरू आहे म्हणून या पट्ट्यातील शेतकरी पूर्ण अडचणीत येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे