गणेश दूध संस्थेच्या दुध उत्पादकांच्या खात्यावर शासनाचे ३ लाख ७१ हजार रुपये अनुदान जमा

1 min read

राजुरी दि.१६:- राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जुन्नर तालुक्यातील गणेश दुध संस्था राजुरीच्या दुध उत्पादकांच्या खात्यावर हे अनुदान जमा झाले असल्याची माहीती गणेश सहकारी दुध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे व उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे यांनी दिली.

त्यानुसार प्राथमिक टप्यातील २०९ शेतकऱ्यांना ७४ हजार २५५ हजार लिटर दुधाला पाच रुपये प्रमाणे ३ लाख ७१ हजार २७५/- रुपये अनुदानाची रक्कम शासनामार्फत थेट दुध उत्पादकांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे दुध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे यांनी सांगितले.

दुध उत्पादकांना अनुदान मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी सतीश डोइफोडे यांच्या विषेश प्रयत्नांतुन पशुसंवर्धन डॉ. श्रीधर बडे तसेच संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे व संस्था कर्मचाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली.

तसेच उर्वरित जास्तीत जास्त दुध उत्पादकांना पुढील दोन टप्यांमध्ये अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या विहीत नमुन्यातील दुधाची माहीती अपलोड केलेली असल्याचे व लवकरच त्यांना देखील अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे संस्था सचिव यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे