३६ गुंठ्यांत १३ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन ; सेंद्रिय शेतीच्या जोरावर ७१ हजारांचा नफा

1 min read

बेल्हे दि.११:- जुन्नर तालुक्यातील शिरोली सुलतानपुर येथील चंद्रसेन जगदाळे या शेतक-याने सेंद्रिय खतांचा वापर करून ३६ गुंठ्यांत १३ पोती हरब-याचे भरघोस उत्पादन मिळवले असून त्यांना यातून ७१ हजार रुपयांचा नफा मिळवला आहे.

चंद्रसेन जगदाळे हे शेतकरी आपल्या शेतात दरवर्षी सेंद्रिय शेती करून विविध पिके घेत असतात. खरीप हंगामात त्यांनी सुरवातीला शेतात बाजरी चे पिक होते. बाजरी निघल्यानंतर शेतात प्रथम दोन ट्राॅली शेणखत पांगवुन टॅक्टर च्या साह्याने रोटरून घेतल्यानंतर पंधरा दिवस ती जमीन तापत ठेवली.

पंधरा दिवसांनतर‌ ‘विराट ‘ या जातीचे ६ ते ७ किलो हरबरा चे बियाने आणुन पेरले. योग्य प्रकारची औषध तसेच खते व फवारणी केल्याने हे पीक चांगले निघाले असुन या पिकासाठी औषधे व बियाणे, काढणी, खुरपणी या सर्वांचा खर्च ८ हजार रूपये आला. सध्या हरभरा पिकाला एका किलोला ५० ते ५५ रुपये बाजार भाव मिळत आहे.

झालेला खर्च वजा जाता त्यांना ६९ ते ७१ रुपयांचा नफा झाला आहे. चंद्रसेन जगदाळे यांनी कुठल्याही प्रकारे रासायनिक खतांचा वापर केला नसुन फक्त शेण खत वापरले आहे. विशेष म्हणजे या पिका अगोदर या ठिकाणी बाजरी पिक घेतले होते. या पिकातुन १८ पोती बाजरीचे उत्पादन घेतले आहे. जगदाळे यांचा आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा कल असल्याने उत्पादनात वाढ होऊन त्यांना चांगला नफा मिळत आहे.

जगदाळे यांना तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, कृषी अधिकारी,राजश्री नरवडे,सुजाता खेडकर,बाबाजी बांगर आदींनी वेळच्यावेळी मार्गदर्शन केले आहे.

प्रतिक्रिया

“हरब-याचे पीक घेत असताना रासायनिक खतांचा वापर न करता फक्त शेण खताचा वापर केल्याने सहा किलो हरबरा चे बियाने पेरले होते. यामधुन १३ पोती चे उत्पादन निघाले आहे.”

चंद्रसेन जगदाळे, हरभरा उत्पादक शेतकरी 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे