चाकण वाहतूक कोंडीवर अमोल कोल्हे यांनी निवडणूक जिंकली:- शिवाजीराव आढळराव पाटील

1 min read

राजगुरूनगर, दि.८ :- राजगुरूनगर येथे महायुतीचे न अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (दि.७) रोजी – घेण्यात आला. या वेळी शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते.शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, चाकण वाहतूक कोंडीवर डॉ. कोल्हे यांनी निवडणूक जिंकली. मात्र, पाच वर्षात काहीच केले नाही. उलट ८० टक्के निधी त्यांचा परत गेला, असा हा महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहे. त्यामुळे मतदार संघातील प्रश्न सुटले नाहीत. ‘शिरूरचा खासदार राउंडवर येणारा नको तर ग्राउंडवर येणारा पाहिजे, असे आवाहन माजी खासदार व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.सगळ्याचे कर्तव्य आहे की, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे तर आहेच परंतु आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व अजित पवार यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्यांनी जो शब्द दिला आहे, तो साकार करायचा आहे. जनतेत राहणाऱ्या माणसाला निवडून द्या. शिरूरचा खासदार राउंडवर येणारा नको तर ग्राउंडवर येणारा पाहिजे त्यासाठी सर्वांनी काम करा, असे आवाहन केले. नाशिक रेल्वे आणि चाकण वाहतूक कोंडी, असे महत्त्वाचे प्रश्न सोडविणारा खासदार करा.या मेळाव्याला आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान पोखरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, अरुण गिरे, अरुण चांभारे, इरफान सय्यद, अशोक भुजबळ, बाबा राक्षे, कैलास सांडभोर, राजू जवळेकर, शांताराम भोसले, दिलीप नाईकनवरे, सुरेखा मोहिते पाटील, नितीन गोरे यांच्यासह शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससह सहयोगी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे