प्रचार सुरू होण्याआधीच मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द

1 min read

शिरूर दि.६:- शिरूर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्यावतीन मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती.

तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

वंचीत ची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या संविधान वाचविण्याची मोहीम उघडली आहे.

त्यामुळे ते लिहिलेल्यांच्या ( भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर) नातवाने (प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर) उमेदवारी देणे यापेक्षा आणखी काय हवं,” अशी पहिली प्रतिक्रिया पैलवान बांदल यांनी ‘ दिली होती.

तर खासदार डॉ अमोल कोल्हे हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नाहीत, तर आढळराव हे आयात उमेदवार आहेत. त्या दोघांनाही या पैलवानाचा फटका सहन होणार नाही. सहाही विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद आहे,” असा दावा बांदलांनी केला होता.

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीबरोबरची युती फिसकटल्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मंगळवार दिनांक २ रोजी वंचित’ने पाच नावे जाहीर केली. त्यात शिरूरमध्ये ‘वंचित’ने पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिल्याने तेथील निवडणुकीत आता ट्विस्ट आला होता.

मात्र, या मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी दिनांक ५ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर वंचितकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे