सिंहगडच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात
1 min read
वडगाव बुद्रुक दि.४:- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव बुद्रुक, पुणे मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल हितेशु पॅकेजिंग, खानापूर, जुन्नर व श्री साई इलेक्ट्रिकल्स, जुन्नर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सदर शैक्षणिक सहलीमध्ये 24 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सदर शैक्षणिक सहलीमध्ये श्री हितेश शहा, डायरेक्टर व श्री संजय गाडेकर, मॅनेजिंग डायरेक्टर हितेशु पॅकेजिंग, जुन्नर यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण प्रकल्पाबद्दल माहिती दिली. यामध्ये लागणारा कच्चामाल व त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये बॉक्स कसे बनवले जातात याचे प्रात्यक्षिक दाखवले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व प्रक्रिया समजावून घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये असलेल्या मिनी प्रोजेक्ट या विषयाशी संबंधित लो होल्टेज ट्रान्सफॉर्मर्स बनवण्याची प्रक्रिया श्री साई इलेक्ट्रिकल चे डायरेक्टर श्री राहुल काळे यांनी समजावून सांगितली व विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करत सदर ट्रान्सफॉर्मर बनवून पाहिला.
सदर शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे उपप्राचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम.बी. माळी, इंडस्ट्रियल व्हिजिट समन्वयक प्रा. गणेश गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसमवेत प्रा. तुषार काफरे प्रा. सुवर्णा रोहिले प्रा. सपना कांबळे यांनी सदर शैक्षणिक सहलीचे आयोजन केले.