बीट स्तरीय उमंग प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं-१ शाळेचे यश

1 min read

बेल्हे दि.१:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं-१ शाळेत द हंस फाऊंडेशन, शिक्षणा फाउंडेशन आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने बीट स्तरीय’ उमंग प्रश्नमंजुषा – २०२४ ‘ ही स्पर्धा पार पडली. यामध्ये निमगाव सावा , अणे, बेल्हे केंद्रातील शाळांनी सहभाग घेतला. प्रशमंजुषा स्पर्धेचे आयोजन संस्थेचे मेंटोर स्वाती शेलार,आदेश जगताप, सौरभ दिघे, महेश नायकोडी आणि रामदास दाभाडे यांनी केले होते.

साधारणपणे २००३ पासून ही संस्था सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. जुन्नर तालुक्यात २०२३ पासून संस्थेने सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर काम चालू केले आहे. या अगोदर संस्था पुणे जिल्ह्यातील दौंड, खेड आणि आंबेगाव तालुक्यात काम करत आहे.

जिल्हा परिषद शाळांच्या मुलांच्या गुणवत्तेत हातभार लावण्यासाठी संस्था शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. यामध्ये बेल्हे नंबर १ शाळेतील तिसरी व चौथी चे विद्यार्थी ध्येया पिंगट, आराध्य भालेराव, कृष्णाली कोकाटे, अताएहुसेन सैय्यद, परसिस जैसवाल यांनी शाळेचे प्रतिनिधीत्व करत यश मिळवून दिले.

यास्पर्धेत स्क्रीन वर मुलांना प्रश्न दाखविण्यात आले. त्यानुसार शुभारंभ फेरी ,विजेती फेरी अशा अनेक फेऱ्या यामध्ये होत्या. मुलांना बेल वाजवून बहुपर्यायी प्रश्न उत्तरे यावेळी घेण्यात आली. लवकर उत्तर देणारा गट यामध्ये विजयी घोषित करण्यास आला. मुलांनी या स्पर्धेचा आनंद घेतला.

बीटस्तरिय प्रश्नमंजुषा स्पर्धेत बेल्हे नं-१ शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांनी मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थांचे कौतुक करत तालुका स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बीटमधील संतोष साळुंके,महेश साबळे, प्रमिला निचीत, प्रताप फापाळे इ. शिक्षक उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुप्रिया बांगर व सर्व सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी स्पर्धेचे आयोजन केलेबद्दल संस्थेचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे