‘ शिवनेरी एक्स्प्रेस ‘ च्या बातमी नंतर कल्याण – नगर महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजवले 

1 min read

राजुरी दि.३०:- कल्याण – नगर महामार्ग खड्यांबाबत ‘शिवनेरी एक्सप्रेस’ ने बुधवार दि.२७ रोजी ‘कल्याण – नगर महामार्गावर बेल्हे ते आळेफाटा दरम्यान १० ते १५ खड्डे धोकादायक’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. सदर बातमीची दाखल घेत महामार्ग प्रशासनाने शुक्रवार दि.२९ रोजी तत्काळ खड्डे बुजून पॅच वर्क करण्यात आले.

आळेफाटा ते आणे घाट पर्यंत कल्याण- नगर महामार्गाला अनेक धोकादायक खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून ते तात्काळ बुजवावेत अशी स्थानी ग्रामस्थांनी मागणी केली होती. रस्त्याला मधोमध खड्डे असल्यामुळे दूचाकी स्वराला रात्री अपरात्री या खड्यांचा धोका निर्माण झाला होता.

तसेच खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात घडण्याची शक्यता होती. तसेच आणे घाट हा तीव्र उताराचा आणि नागमोड्या वळणांचा असल्यामुळे गाडी चालकाला खड्यांचा अंदाज येत नव्हता. गाडी भरधाव वेगात असताना अचानक खड्डा चुकवताना किंवा ब्रेक दाबला तरी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता होती.

महामार्ग प्रशासनाने मार्गावरील सर्व धोकादायक खड्डे तात्काळ बुजवल्याने राजुरी, बेल्हे ग्रामस्थांनी ‘ शिवनेरी एक्स्प्रेस’ चे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे