कौतुकास्पद! गुळूंचवाडीच्या श्रद्धाची सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य अभियंता पदावर नियुक्ती
1 min read
बेल्हे दि.३०:- गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथील श्रद्धा शिवाजी देवकर हीची रायगड तालुक्यात पनवेल येथे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मध्ये स्थापत्य अभियंता या पदावर नियुक्ती झाली आहे. श्रद्धा देवकर हीचे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्ह्यातील रसायनी येथील जनता विद्यालय शाळेत झाले.
दहावीत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तिने पनवेल येथील पिल्ले महाविद्यायात सिव्हिल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले त्यानंतर तिने अहोरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षामध्ये अव्वल क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.
एका मध्यमवर्ग कुटुंबातील मुलीने उंच भरारी घेत आपल्या कुटुंबाचे तसेच गावचे नाव प्रगती पथावर नेल्याचा आनंद तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. श्रद्धा देवकर हिचा पनवेल येथील राहत्या ठिकाणी युवाशक्ती पनवेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.