शुभम तारांगण गृहप्रकल्पामध्ये धुलिवंदन व होळी सण जल्लोषात साजरा
1 min read
आळेफाटा दि.२७:- २५ मार्च रोजी सगळीकडे धूलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. पुणे जिल्ह्यात रंगाच्या रंगात प्रत्येकजण रंगून गेला होता.
आळेफाटा येथील शुभम तारांगण गृहप्रकल्पामध्ये रहिवाश्यांनी धूलिवंदनला एकमेकाला रंग लावून सण साजरा केला. या वेळी बच्चे कंपनी सह सर्व रहिवाशी रंगीबेरंगी झाले होते.
रविवारी २४ मार्च रोजी सर्वांनी एकत्र येऊन रात्री होळीदहन केल्यानंतर रंग लावून धूलिवंदन सण सुरू झाला. सकाळी लवकर उठून बच्चे कंपनी ही एकमेकाला रंग लावून रंगीबेरंगी झाले होते.
बच्चे कंपनीसह आबालवृद्धही या रंगाच्या सणात न्हाहून गेले होते. अनेकजण हे नैसर्गिक रंगांचा वापर करत होते.