कल्याण – नगर महामार्गावर बेल्हे ते आळेफाटा दरम्यान १० ते १५ धोकादायक खड्डे; अपघाताला देतायत निमंत्रण
1 min read
बेल्हे दि.२७:- आळेफाटा ते आणे घाट पर्यंत कल्याण नगर महामार्गाला अनेक धोकादायक खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून ते तात्काळ बुजवावेत अशी स्थानी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
रस्त्याला मधोमध खड्डे असल्यामुळे दूचाकी स्वराला रात्री अपरात्री या खड्यांचा धोका निर्माण होत आहे तसेच खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात होत आहेत.
तसेच आणे घाट हा तीव्र उताराचा आणि नागमोड्या वळणांचा असल्यामुळे गाडी चालकाला खड्यांचा अंदाज येत नसून गाडी भरधाव वेगात असताना अचानक खड्डा चुकवताना किंवा ब्रेक दाबला तरी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतोच.
या घाटात ५ ते ६ धोकादायक खड्डे आहेत. गेल्या वर्षभरात या ठिकाणी वारंवार अपघात झाले आहेत. या अपघातात काही जणांना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे.
तर कित्येक जणांचा मृत्यू ओढवला आहे. या घाटातील रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
या बाबत महामार्ग प्रशासनाशी संपर्क साधला असता लवकरच सर्व खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.