जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबेवाडी ची अभिलेखे रेकॉर्ड तपासणी
1 min read
खेड दि.२३:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबेवाडी (ता.खेड) येथे शुक्रवार दि.२२ रोजी केंद्र प्रमुख भरत लोखंडे यांनी सखोल भेट दरम्यान वार्षिक तपासणी केली. या भेटी अंतर्गत शालेय अभिलेखे, रेकॉर्ड तपासणी करण्यात आली.
शालेय रेकॉर्ड तपासणी, विद्यार्थी गुणवत्ता तपासणी करण्यात आली. विविध सूचना करण्यात आल्या. या वेळी तपासणी प्रमुख केंद्र प्रमुख भरत लोखंडे, तपासणी सदस्य बुरसे सर, विशाल शिंदे, दुलाजी तिटकारे, तायडे सर, फसले सर उपस्थित होते.