लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांवर होणार कारवाई
1 min read
अहिल्यानगर दि.२१:- लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियाचा वापर करून लोकसभेसाठीच्या उमेदवारांची बदनामी केली जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
सोशल मीडिया व इतर प्रसिद्धी माध्यमातून बदनामी करणाऱ्या तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचा सायबर पोलीस ठाणे कारवाई करणार आहे, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांचे प्रचारादरम्यान सोशल मीडियाव्दारे बदनामी करणे कायद्याने गुन्हा आहे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पाेलिसांचे सोशल मीडियावर विशेष लक्ष राहणार आहे.
सोशल मीडियाव्दारे प्रसारित होणाऱ्या फेकन्यूज संदर्भात तक्रार देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून ९१५६४३८०८८ हा मोबाईल क्रमांक प्रसारीत करण्यात आला आहे.