सह्याद्री व्हॅलीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
1 min read
राजुरी दि.१०:- सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता.जुन्नर) येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या संचालिका वर्षा भालेराव उपस्थित होत्या. अनेक पालक महिला उपस्थित होत्या. संचालिका वर्षा भालेराव यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. विजेत्या पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाच्या उप प्राचार्या सुरेखा बांगर, पर्यवेक्षक सलमा चौघुले यांसह सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.