खोडद येथील जी एम आर टी प्रकल्प स्पर्धेमध्ये समर्थ पॉलिटेक्निक चा प्रकल्प प्रथम

1 min read

बेल्हे दि.१:- खोडद येथील जी एम आर टी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेत समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे येथील तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील अनिकेत दिघे, राजेश चव्हाण, प्रमोद गुंजाळ, अनुष्का परदेशी या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “पॅडल ऑपरेटेड पंपिंग अँड प्युरिफिकेशन प्लांट” या प्रकल्पास बी एस्सी.

डिप्लोमा गटामध्ये प्रथम क्रमांक तर तृतीय वर्ष कंप्युटर इंजिनिअरिंग मधील अथर्व बेलकर,दिनेश शिंदे,रोशन निचित,किशोर येवले यांनी सादर केलेल्या “फेस रिकग्नायजेशन अटेंडन्स सिस्टीम” या प्रकल्पास चतुर्थ क्रमांक मिळाल्याची माहिती प्राचार्य प्रा.अनिल कपिले यांनी दिली.

या विद्यार्थ्यांना प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.स्वप्निल नवले,प्रा.शाम फुलपगारे, प्रा.प्रतिमा बढेकर यांनी मार्गदर्शन केले.

तसेच ग्रोइंग डॉट या मोबाइल ऍप च्या माध्यमातून ऑनलाइन घेण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये जगभरातून अनेक प्रकल्प व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या ऑनलाईन प्रदर्शनामध्ये समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग अंतिम वर्षातील सोनाली नाभगे व मोनिका खरमाळे यांनी सादर केलेल्या.

“ब्लूटूथ कंट्रोल ग्रास कटर अँड पेस्टीसाईड स्प्रे रोबोट” या प्रकल्पास चतुर्थ क्रमांक मिळाला.हा प्रकल्प तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी व प्रा.प्रियांका लोखंडे,प्रा.दिपाली गडगे यांनी मार्गदर्शन केले. सदरच्या विज्ञान प्रदर्शनात राज्यभरातून तसेच राज्याच्या बाहेरून देखील प्रकल्प सादर करण्यात आले होते.

३०० हून अधिक शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेऊन ७०० हून अधिक विविध प्रयोग व प्रकल्प सादर झाले.
विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण एनसीआरए चे प्रोफेसर सी एच ईश्वर चंद्रा,वरिष्ठ भूवैज्ञानिक अफरोज चिष्ती,वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.जे.के.सोळंकी, प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

समर्थ शैक्षणिक संकुलातील डिप्लोमा व डिग्री चे विद्यार्थी नवनवीन वैज्ञानिक संकल्पना घेऊन समाजाभिमुख गरजांची पूर्ती करणारे प्रकल्प सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. दरवर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय,चतुर्थ क्रमांक अशी पारितोषिके पटकावत असतात.याही वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दर्जेदार प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला. त्या

बद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, टेक्निकल डायरेक्टर प्रा.चंद्रशेखर घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे