सुवर्णसंधी, भव्य विज्ञान प्रदर्शन व रेडिओ दुर्बीण पाहण्याची सुवर्णसंधी (28 फेब्रुवारी व 29 फेब्रुवारी 2024)
1 min readखोडद दि.२७:- आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली रेडिओ दुर्बिण, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातील खोडद (नारायणगाव, ता. जुन्नर, जिल्हा. पुणे) येथे असून टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि डॉ गोविंद स्वरूप यांच्या मार्गदर्शनातून जी.एम.आर.टी (Giant Metrewave Radio Telescope) हा प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पात एकूण 30 रेडिओ दुर्बिणी वाय (Y) या इंग्रजी आकारात उभारल्या आहेत. प्रत्येक दुर्बिणीच्या तबकडीचा ” व्यास 45 मीटर्स ” आहे. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हि रेडिओ दुर्बिण पाहण्यासाठी मोफत खुली आहे. तरी विज्ञान प्रेमी, विद्यार्थी, पालक, वाचक यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, दर वर्षी अंदाजे 20 हजार विज्ञान प्रेमी. खगोलशास्त्रज्ञ, नामवंत संस्थांचा सहभाग, विविध शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे भरपूर व अतिशय सुंदर असे प्रकल्प असून विद्यार्थी, पालक, वाचक या दुर्बिणीला भेट देतात….आपण हि आपले मित्र, पालक, नातेवाईक, विद्यार्थी यांसोबत या दुर्बिण आणि विज्ञान प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी व इतरांना ही माहिती कळवावी ही विनंती GMRT विभागाकडून करण्यात आली आहे.■ दिनांक 28 फेब्रुवारी व 29 फेब्रुवारी 2024 (दोन दिवस फक्त)■ वेळ सकाळी 9.30 ते 5.00 वाजेपर्यंत
■ पत्ता : पुणे – नाशिक हायवे, खोडद (नारायणगाव), ता. जुन्नर, जिल्हा.पुणे 410504■ नारायणगाव ते खोडद अंतर 13 किलो मीटर.■ http://www.gmrt.ncra.tifr.res.in अधिक माहितीसाठी (जीएमआरटी) संपर्क : 02132-258400, 258300, 252115