आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांसाठी २ कोटी ५० लक्ष निधी मंजूर

1 min read

जुन्नर दि.२७:- जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी तालुक्यातील १७ विकास कामांना २ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.या मध्ये खालील कामांचा समावेश आहे.१) पिंपळवंडी येथे दफनभुमी संरक्षण भिंत बांधणे – १५ लक्ष रुपये, २) हिवरे बु. येथे दफनभुमी संरक्षक भिंत बांधणे – १० लक्ष रुपये, ३) राजुरी मुस्लिम शादीखाना हॉल बांधकाम व सुशोभीकरण करणे – २० लक्ष रुपये, ४) राजुरी मुस्लिम सुंन्त्री शाही कब्रस्तानचे कंपाउंड वॉल बांधणे – १० लक्ष रुपये. ५) राजुरी मुस्लिम सुंन्त्री शाही कहस्तान चे परिसर सुधारणा करणे व सुशोभीकरण करणे– १० लक्ष रुपये, ६) राजुरी ईदगाह मैदान संरक्षक भिंत व सुशोभीकरण करणे- १० लक्ष रुपये, ७) निमगाव सावा शहाबुददीनवलीबाबा सामाजिक सभागृह बांधणे – १० लक्ष रुपये, ८) निमगाव सावा प्रजिमा ९ ते पटेल वस्ती रस्ता करणे – १० लक्ष रुपये, ९) आळे (आळेफाटा) येथील एन.एच. ६१ ते मुस्लिम मोहल्ला (कॅनॉलमार्गे) अंतर्गत रस्ता करणे – १० लक्ष रुपये. १०) आळे येथील आळे गावठाण मोहल्ला ओढा लगत संरक्षण भित बांधणे – १० लक्ष रुपये, ११) आळे येथील पुणे नगर हायवे ते रोहित पेटस आळेफाटा मोहल्ला रस्ता करणे- १० लक्ष रुपये, १२) आळे येथील पटेल सर ते मज्जित (आळेफाटा मोहल्ला) रस्ता करणे – १० लक्ष रुपये. १३) ओतूर येथे जमात खाना/ शादीखाना बांधणे – ३० लक्ष रुपये, १४) ठिकेकरवाडी येथील शादिखाना सुशोभीकरण करणे – १० लक्ष रुपये, १५) चिंचोली येथे शादीखाना बांधणे – ३० लक्ष रुपये, १६) सावरगाव येथे शादीखाना बांधणे – ३० लक्ष रुपये, १७) वडगाव कांदळी येथे शादीखाना बांधणे – १५ लक्ष रुपये

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे