जिंदगी फाऊंडेशन कार्यालयाच्या रूपाने समाजसेवेचा “महाविजय”

1 min read

करंजी दि.२६:- पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील त्रिभुवनवाडी फाटा येथील जिंदगी फाऊंडेशन चे कार्यालय म्हणजे समाजसेवेचा “महाविजय” असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त आदर्श शिक्षक तथा शिक्षक नेते सुभाष अकोलकर यांनी व्यक्त केले आहे.पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले उर्फ जिंदगी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिंदगी फाऊंडेशन त्रिभुवनवाडी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सुभाष अकोलकर बोलत होते. स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांचे नाव “महादेव” होते व ज्यांनी सेवेचे काम हाती घेतले आहे. असे स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांचे चिरंजीव विजय कारखेले यांचे नाव “विजय आहे; त्यामुळे जिंदगी फाउंडेशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमामुळे जिंदगी फाउंडेशन त्रिभुवनवाडी हे कार्यालय म्हणजे समाजसेवेचा महाविजय आहे असे प्रतिपादन सुभाष अकोलकर यांनी केले आहे.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीक्षेत्र बाळनाथ गडाचे मठाधिपती संतचरणरज छगन महाराज मालुसरे, सहउद्घाटक रामायणाचार्य ह.भ.प. गणेश महाराज कुदळे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे सचिव कुशलदादा भापसे, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे, अहमदनगर पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड चे प्रल्हाद पालवे. चार्टर्ड अकाउंटंट छत्रपती कारखेले, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, देवराईचे सरपंच अक्षय भैय्या पालवे, करडवाडी चे माजी सरपंच अर्जुन बुधवंत, उद्योजक संजय बुधवंत, ज्येष्ठ पत्रकार अशोक मोरे, आदर्श शिक्षक देविदास शिंदे, त्रिभुवनवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन केरूअण्णा कारखेले, देवराई विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीश माणिक पालवे. उद्योजक शिवाजी कारखेले, रावसाहेब कारखेले, लक्ष्मण कारखेले, ग्रामपंचायत सदस्य अंबादास कारखेले, बाबासाहेब कारखेले, रोहिदास कारखेले, युवराज कारखेले, रविकिरण कारखेले, गायनाचार्य जयानंद आव्हाड, उद्योजक संतोष चोभे, शिवाजीराव यादव, भगवद्गीता प्रवक्ते भाऊसाहेब शेलार, सुरेश दगडखैर यांच्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील समाजसेवेच्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिंदगी फाउंडेशन त्रिभुवनवाडी या कार्यालयामार्फत ‘जिंदगी सेवाश्रम’ सुरू होत असून यात वृद्ध व निराधारांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था मिळणार आहे. याचबरोबर जिंदगी फाऊंडेशन या कार्यालयात कार्यालयाचे स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी व कामातून मिळणारा मोबदला आणि देणगी स्वरूपातून मिळालेली रक्कम सेवाश्रमाला खर्च करण्यासाठी ‘जिंदगी वधू वर सूचक संस्था’ सुरू करण्यात येत आहे. यात विवाह इच्छुक वधूवरांना नाममात्र शुल्कात विवाह नोंदणी करता येणार आहे. तसेच ‘कारखेले सर मॅरेज इव्हेंट्स’ या उपक्रमामुळे संपूर्ण विवाह पॅकेज याचबरोबर मंगल कार्यालय, डेकोरेशन, निवेदक, बँड, आर्केस्ट्रा, केटरर्स या सर्व गोष्टी याच कार्यालयात उपलब्ध होणार आहेत; त्यामुळे वर- वधू पित्यांची धावपळ थांबणार असून विवाह सोहळा आनंदात पार पडण्यासाठी मोलाची मदत मिळणार आहे. या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना व बेरोजगार युवकांना बँक लोन व विमासुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे अनेकांची उद्योजक व प्रगतशील शेतकरी बनण्याची स्वप्ने साकार होण्यास मदत होणार आहे. तसेच “जगदंबा प्रॉपर्टीज” च्या माध्यमातून अनेकांना इच्छित स्थळी जमीन, प्लॉट, फ्लॅट व फार्म हाऊस घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे. तसेच “जिंदगी न्यूज नेटवर्क”च्या माध्यमातून परिसरातील घडामोडींचा कार्यक्रमाचा तात्काळ आढावा घेतला जाणार आहे; त्यामुळे परिसरातील समस्या प्रशासनापर्यंत पोहचवून समस्या सुटण्यास मदत होणार आहे तसेच उल्लेखनीय कार्याचा गौरव सुद्धा होणार आहे. या उपक्रमातून मिळणारी सर्व रक्कम ही सामाजिक उपक्रमासाठी व सेवाश्रमासाठी खर्च केली जाणार असल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर काम हे ऑफिसमध्ये नियुक्त केलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यामार्फत व वरिष्ठ संपादकामार्फत पार पडणार असल्यामुळे सर्वांना विनम्र सेवा मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिंदगी फाऊंडेशन त्रिभुवनवाडी चे संस्थापक विजय कारखेले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक भाऊसाहेब शेलार तर आभार प्रदर्शन शांता कारखेले यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे