निमगाव सावा येथील श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
1 min read
निमगाव सावा दि.२०:- श्री. पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भास्कर औटी व रूपेश जावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी पुतळ्याचे पूजन केले. संस्कार महाराज गाडगे यांनी स्तोत्र म्हटले. संजय उनवने यांनी छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगितली. याप्रसंगी संदीपान पवार अध्यक्ष (पांडुरंग ग्रामीण पतसंस्था निमगाव सावा), वसंत जाधव प्रसिद्ध गाडामालक, धर्मेंद्र गाडगे अध्यक्ष चंपाषष्ठी सोहळा, भाऊ थोरात संस्थापक छावा प्रतिष्ठान.
नवनाथ गाडगे उपाध्यक्ष वाचनालय, संजय उनवणे सदस्य वाचनालय, शिवाजी मुंढे, गणपत काटे, प्रकाश गाडगे, सुभाष जावळे, दामोदर खाडे, रामचंद्र मते, हारून पटेल, शंकर गाडगे सदस्य वाचनालय, सखाहरी खाडे सदस्य वाचनालय, पिरमंहमद पटेल सदस्य वाचनालय, जितेंद्र जावळे, सुनील शेळके, हमिद पटेल नुराभाई पटेल पप्पु घोडे.
चिमाजी खाडे, युसुफ पटेल, सुभाष मते, प्रदिप भालेराव, साहिल पटेल, अब्दुल पटेल, रामदास घोडे, साहिल घोडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांसाठी पोहे व चहा फराळ म्हणून ठेवण्यात आला होता.सुत्रसंचलन व प्रास्ताविक भाऊ थोरात यांनी केले तर संजय उनवने यांनी आभार प्रदर्शन मानले.