इथेनॉल निर्मितीच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

1 min read

दिल्ली दि.२२:- इथेनॉल निर्मितीच्या संदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी आता ऊसाऐवजी मकाचा जास्त वापर केला जाणार आहे. साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं आता ऊसाऐवजी मका अधिक वापरण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती ही मकापासून केली जाणार आहे. सरकारनं सहकारी संस्था नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांना इथेनॉल तयार करण्यासाठी यावर्षी 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने मका पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही सहकारी संस्था 2023-24 या पीक वर्षात 2,090 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किंमतीवर मका खरेदी करतील आणि इथेनॉल निर्मात्यांना 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने पुरवठा करतील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे