समर्थ पॉलिटेक्निक मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धा संपन्न

1 min read

बेल्हे दि.१०:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (ता.जुन्नर) येथे नुकतेच राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पुणे विभागातील विविध विद्यालयातील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कार्यालय पुणे चे उपसचिव मोहम्मद उस्मानी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले, शैक्षणिक समन्वयक प्रा. संजय कंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यानी नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी व प्रत्येक वेळी आपल्यामधील उणिवा दुर करून परिपूर्ण बनावे असे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोहम्मद उस्मानी म्हणाले.सोलापूर एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक सोलापूर, जयवंतराव सावंत पॉलिटेक्निक हडपसर पुणे, अशोकराव माने पॉलिटेक्निक कोल्हापूर, समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे. ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक सोलापूर, शासकीय तंत्रनिकेतन पुणे,सिद्धांत कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक पुणे, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक शिरोळ कोल्हापूर, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक सातारा, डॉ.डी.वाय.पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा-सांगली,अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक खंडाळा-सातारा. ट्रिनिटी पॉलिटेक्निक पुणे,संजय घोडावत पॉलिटेक्निक कोल्हापूर, झिल पॉलिटेक्निक पुणे आदी महाविद्यालयातून १७ संघ सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी मॉडर्न ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल्स, ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, इंडस्ट्री ४.०, ॲडव्हान्स मटेरियल इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयांवर पेपर सादरीकरण केले.तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक-सार्थक भुजबळ व तेजस अमृतसागर (आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा-सांगली)द्वितीय क्रमांक:राजेश चव्हाण व प्रमोद गुंजाळ(समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे)तृतीय क्रमांक-आदित्य महाजन (शासकीय तंत्रनिकेतन पुणे)प्रथम क्रमांकासाठी रु.१५०००/-रोख व प्रमाणपत्र.द्वितीय क्रमांक रु.१०,०००/-रोख व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकासाठी रु.५०००/-रोख व प्रमाणपत्र असे या राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप होते. या पेपर सादरीकरणासाठी बाह्य परीक्षक म्हणून एल अँड टी डिफेन्स तळेगाव पुणे येथील क्वालिटी अशुरन्स एक्झिक्यूटिव्ह हरी पोखरकर तसेच मेकॅट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा.जाधव व्ही बी.उपस्थित होते.

प्रा.अनिल कपिले,डॉ.शिरीष धोबे,प्रा.प्रसाद जाधव,प्रा.भैरवनाथ जाधव,प्रा.अमोल खातोडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.या राज्यस्तरीय पेपर सादरीकरण स्पर्धेचे यशस्वी नियोजन करण्यासाठी प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,प्रा.श्याम फुलपगारे,प्रा.संदीप त्रिभुवन,प्रा.ईश्वर कोरडे,प्रा.ज्ञानेश्वर वसपुते,प्रा.अश्विनी मोरे,प्रा.प्रकाश डावखर यांनी परिश्रम घेतले.यावेळी समर्थ पॉलिटेक्निक मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व विविध खाजगी शिष्यवृत्तीचे धनादेश विद्यार्थ्यांना व पालकांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले यांनी सूत्रसंचालन प्रा.हुसैन मोमीन यांनी तर आभार विभाग प्रमुख प्रा.महेंद्र खटाटे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे