सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेज आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड सोबत सामंजस्य करार
1 min read
राजुरी दि.९:- राजुरी (ता. जुन्नर) येथील सहयाद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयाला किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड चे उपाध्यक्ष ग्रुप एच. आर. आणि सी.एच.आर.वो.जॉर्ज वर्गीस यांनी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, कॉम्पुटर इंजिनीयरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि सिव्हील इंजिनीयरिंग विभागांची पाहणी केली. त्याचबरोबर प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच नवनवीन कल्पना आत्मसात करून त्या उपयोगात आणून त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविल्या पाहिजे.
औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे आद्यावत शिक्षण नवीन कोर्सेस समजून घेऊन ते आत्मसात करणे त्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राध्यापकांनी क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून स्वतःला व विद्यार्थ्यांना आद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांची सामान्य जागरूकता आणि ज्ञान वाढवू शकतात, जे कि या स्पर्धात्मक युगासाठी अत्यंत महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
तत्पूर्वी सर्वात जुनी आणि प्रसिद्ध किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड कंपनी आपल्या कॅम्पसमध्ये आल्याबद्दल त्यांचे आभार महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. संजय झोपे यांनी मानले. या कंपनी सोबतच्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी खूप मोठा फायदा होणार आहे असे त्यांनी सांगितले.
या सामंजस्य करारासाठी प्रमुख उपस्थिती किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड चे उपाध्यक्ष जॉर्ज वर्गीस, हॉली ग्रेस अकॅडमी ऑफ फार्मसी च्या संचालक डॉ. प्रीयांबादा सारंगी, शाईन एन. दास, संस्थेचे चेअरमन व्ही.आर.दिवाकरण, संचालक किशोरभाई पटेल, संचालक सचिन चव्हाण, संस्थेचे प्राचार्य डॉ.संजय झोपे, उपप्राचार्य पी. बालारामुडू आणि प्राध्यापकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.