आनंदवाडीच्या अंगणवाडी केंद्राला मिळाला स्मार्ट टीव्ही
1 min readआणे दि.७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी, अंगणवाडी केंद्र आनंदवाडी व आनंदवाडी गाव व शाळा (तालुका.जुन्नर) यांच्या साठी ग्रामपंचायत आणे यांच्या माध्यमातून केलेल्या विविध विकास कामांचा व सुविधांचा लोकार्पण व उदघाटन समारंभ श्री रंगदास स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष. माजी सरपंच श्रीप्रकाश बोरा, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच प्रियंका प्रशांत दाते व उपसरपंच सुहास मुरलीधर आहेर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या समारंभात शाळा व आनंदवाडी गावासाठी शुद्ध पाण्याच्या फिल्टर चे लोकार्पण समारंभ, अंगणवाडी केंद्रासाठी स्मार्ट टीव्ही, जिल्हा परिषद शाळेसाठी संरक्षण भिंत व सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणे यांच्या संकल्पनेतून शाळेसाठी इंटर ऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड चे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्वांच्या साठी शाळा व्यवस्थापन समितीने आमटी महाप्रसादाचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी सरपंच श्रीप्रकाश बोरा,सरपंच प्रियंका प्रशांत दाते, उपसरपंच सुहास आहेर, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा आहेर, संजय डोंगरे, ज्योती आहेर, जयराम दाते, सुनिता दाते, प्रियंका दाते, तांबोळी सर, शिक्षण विस्तार अधिकारी धोंडगे, केंद्रप्रमुख आणे कुऱ्हाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सर्व पालक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती आनंदवाडी, समस्त ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी (आणे) यांनी केले होते. वरील कामे झाल्यामुळे आनंदवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून याप्रसंगी श्रीक्षेत्र आणे गावाच्या सरपंच प्रियंका दाते यांनी आनंदवाडीला भविष्यात देखील निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला.