जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेश कणसे तर सचिवपदी सचिन कांकरिया यांची निवड

1 min read

जुन्नर दि.५:- जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची सन २०२४ ची कार्यकारिणी निवडीची बैठक नुकतीच आळेफाटा येथे पार पडली. यावेळी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. पत्रकार संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – राजेश कणसे (अध्यक्ष), सचिन कांकरिया (सचिव), सुरेश आण्णा भुजबळ (कार्याध्यक्ष), अशोक खरात व मिनानाथ पानसरे (उपाध्यक्ष), विजय चाळक (सहसचिव),

ॲड.संजय शेटे (जिल्हा प्रतिनिधी), अतुल कांकरिया (प्रसिद्धी प्रमुख), दिनकर आहेर (आळेफाटा विभागप्रमुख), मंगेश पाटे (नारायणगाव विभाग प्रमुख), विजय लोखंडे (जुन्नर विभाग प्रमुख), रा.ना.मेहेर (ओतूर विभाग प्रमुख).

तक्रार निवारण समिती – दादा रोकडे (अध्यक्ष), ज्ञानेश्वर भागवत (उपाध्यक्ष) , अण्णा लोणकर (सचिव), कार्यकारिणी सदस्य पुढीप्रमाणे – अमर भागवत, नितीन ससाणे, अशोक डेरे, विजय देशपांडे, अर्जुन शिंदे , हितेंद्र गांधी, नितीन गाजरे, गोकुळ कुरकुटे, अमोल गायकवाड, प्रवीण फल्ले , अभिषेक भुजबळ, फकीर आत्तार, ज्ञानेश्वर केंद्रे. सहयोगी सदस्य – नितीन शेळके, रामदास सरोदे, डी.बी.वाळुंज.

सल्लागार समिती – भरत अवचट, रवींद्र पाटे, रवींद्र कोल्हे, आनंद कांबळे, धर्मेंद्र कोरे, वसंत शिंदे, लक्ष्मण शेरकर, दामोदर जगदाळे. कायदेविषयक सल्लागार – ॲड.यू.सी.तांबे , ॲड.भूषण शेटे, ॲड.रवींद्र देवकर, ॲड.अनिकेत भुजबळ या बैठकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वेळोवेळी विविध आरोग्य शिबिरे व इतर वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा ठराव करण्यात आला.

अशोक खरात यांनी प्रास्ताविक करून अध्यक्ष निवडीची सूचना मांडली. रवींद्र पाटे यांनी अध्यक्षपदासाठी अनुमोदन दिले. पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश कणसे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष वसंत शिंदे यांनी मागील वर्षातील कामांचा आढावा सादर करून सर्वांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे