दत्तात्रय रावते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

1 min read

खेड दि.५:- फेब्रुवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवाडी (ता. खेड) शाळेचे उपशिक्षक दत्तात्रय सोमा रावते यांना पंचायत समिती खेड शिक्षण विभाग यांच्या वतीने खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तालुका पातळीवर विद्यार्थी कला क्रीडा महोत्सवात दैदिप्यमान यश, शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन, गावपातळीवर शालेय भौतिक सुविधांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न.इ . बाबतीत यशस्वी मार्गदर्शन केले. यावेळी खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे, केंद्र प्रमुख भरत लोखंडे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे