बोरी खुर्द गावाला १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी प्राप्त
1 min readबोरी खुर्द दि.४:- शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे युवा आमदार अतुल बेनके यांच्या निधीतून, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली व सरपंच कल्पना वैभव काळे यांच्या पाठपुराव्यातुन बोरी खुर्द (ता.जुन्नर) गावाला १ कोटी ७० लाख रुपये भरघोस निधी प्राप्त झाला आहे. या मुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यामधे बोरी खुर्द येथील मुक्ताईमाता मंदिर ते नेहारवस्ती रस्ता करणे (५ लक्ष), बोरी खुर्द येथील प्रजीमा ९ ते तरटीमाता मंदिर रस्ता करणे (रु.०५ लक्ष), बोरी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय विस्तारित काम करणे (रू.१० लक्ष), गावठाण श्री हनुमान चौक रस्ता कॉकेटीकरण करणे (रु.१० लक्ष). आत्र्याचा बोळ ते जुना जुन्नर शिरोली मार्ग पटाडे मळा रस्ता करणे (रु.०५ लक्ष), बोरी खुर्द गावठाण अंतर्गत रस्ता करणे (रु.१० लक्ष), श्री गणेश मंदिर वसई ते प्रजीमा ८ रस्ता करणे (रु.१० लक्ष), वसई ते बेल्हेकर मळा रस्ता करणे (रु.०५ लक्ष), शेटे वस्ती ते चारंगेश्वर मंदीर रस्ता करणे.(रू.१० लक्ष), विठ्ठल मंदिर पालखी मार्ग कॉक्रीटीकरण करणे (रू.१० लक्ष), गावठाण स्मशानभुमी परिसर सुधारणा करणे (१० लक्ष), स्मशानभुमी संरक्षण भिंत दुरूस्ती करणे (रु.१० लक्ष), डाळिंबी बांगर चिंचवडे वस्ती रस्ता करणे (रु.१० लक्ष), साळवाडी येथील प्रजिमा ८ ते गणेश मंदिर वसई रस्ता करणे. (रु.१० लक्ष), साळवाडी गणेश मंदिर ते प्रजिमा ८ रस्ता करणे ( रु.१० लक्ष), प्रजिमा ८ बोरी-बेल्हे रोड ते गडाचा ओढा बेल्हेकरमळा रस्ता करणे (रु.१० लक्ष), बोरी खुर्द तर्टीमाता श्रीमंतनगर रस्ता ,(रु.१० लक्ष), निहार वस्ती रस्ता (रु.१० लक्ष), पाटोळे वस्ती ते चिंचवडे मळा रस्ता करणे (रु.१० लक्ष)असा एकूण १ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.