जुन्नर बिबट सफारी प्रकल्पास मंजूरी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

1 min read

जुन्नर दि.५:- जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी उभारण्यास दिलेली मान्यता ही सविस्तर प्रकल्प आराखडा तसेच प्रकल्प आराखडा मांडणी अहवालास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यतेस अधिन राहून देण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या ८०४३.२३ लाख रुपये खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आमदार अतुल बेनके यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, त्यांना मिळालेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ यामुळे, जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा आणि पर्यटनवाढीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

या बिबट सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी दुहेरी प्रवेशद्वार तयार करण्यात येणार असून सदर प्रवेशद्वार हे विद्युत स्वयंचलित व सेन्सर असलेले असणार आहे. सफारीमध्ये २.६ कि.मी. लांबीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहे.

हा रस्ता बिबट, वन्यप्राण्यासाठी तयार केलेले पाणवठे, तसेच, त्यांच्या अधिवासाजवळून जाणार असल्याने पर्यटकांना बिबट वन्यप्राणी जवळून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. सफारीमध्ये पर्यंटकांना फिरण्यासाठी २० ते २५ आसन क्षमता असलेल्या सुरक्षित तसेच बंदिस्त बस खरेदी कऱण्यात येणार आहेत. सदर बस सफारी मार्गावरुन विहित वेळेत पर्यटकांसह मार्गक्रमण करतील. हा वेगळा अनुभव असणार आहे.

बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. जुन्नर परिसरातील बिबट्यांची लक्षणीय संख्या पर्यटनवाढीसाठी उपयोगी असल्याचे लक्षात घेऊन. उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरु करण्यासाठी आग्रही होते. त्यादृष्टीने सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा सुरु होता. सोमवार दि.५ रोजी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने जुन्नर वनक्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला झाला आहे.”

अतुल बेनके, आमदार जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे