आणे गावाला १ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी प्राप्त; आणे गावात विकास कामांचा धडाका
1 min readआणे दि.४:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सहकार्याने, शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे युवा आमदार अतुल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून,
माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रियंका प्रशांत दाते यांच्या पाठपुराव्यातुन श्रीक्षेत्र आणे (ता.जुन्नर) गावचा सर्वांगीण विकास व समाजाभिमुक स्वरूपाचा असा भरघोस निधी प्राप्त झाला.
आणे गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच प्रियंका प्रशांत दाते यांच्या सरपंच पदाच्या वर्षपूर्ती निमित्त मोठ्या प्रमाणात भरघोस स्वरूपात १ कोटी ५२ लाख ५० हजार निधी प्राप्त झाल्याबद्दल आणे व आनंदवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यामधे आणे ते संभेराव वस्ती रस्ता करणे ३० लक्ष, आणे ते आनंदवाडी रस्ता करणे २० लक्ष, आणे जिल्हा परिषद शाळा नवीन १ खोली बांधकाम करणे १२.५० लक्ष, आणे येथील रंगदासस्वामी मंदिर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लक्ष, NH ६१ ते दाते मळा रस्ता करणे १० लक्ष, आणे येथील NH ६१ ते गोडेशेत रस्ता करणे १० लक्ष.
आणे येथील हनुमानदारी रस्ता करणे १० लक्ष, आणे येथे सोलर हायमास्ट दिवे बसविणे १० लक्ष, आणे येथील लोहारमळा ते हनुमानदारी रस्ता करणे १० लक्ष, आणे ते गोडेशेत जोड रस्ता करणे १० लक्ष,
राष्ट्रीय महामार्ग NH ६१ ते आहेर वस्ती गोडेशेत रस्ता करणे १० लक्ष, आणे येथे अरुण आहेर वस्ती यांच्याकडील रस्ता करणे ५ लक्ष, आणे येथिल धनंजय दाते वस्ती रस्ता करणे ५ लक्ष मंजूर झाला आहे.